White Kangaroo Photo Viral: सोशल मीडियावर नेहमीच कशाची ना कशाची चर्चा होत असते. कधी कोणत्या फोटोबाबत तर कधी एखाद्या व्हिडीओबाबत. अशात ऑस्ट्रेलियातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. हा एक पांढऱ्या कांगारूचा फोटो आहे. हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. सामान्यपणे कांगारू हे भुरक्या रंगाचे असतात. पण पांढरा कांगारू लोकांनी पहिल्यांदाच पाहिलाय त्यामुळे लोक अवाक् आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, हा पांढऱ्या रंगाचा कांगारू ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंडच्या बाहेरील भागात एका स्थानिकाने पाहिला. असं सांगितलं जात आहे की, अल्बिनो कांगारू साधारण सहा महिन्यापूर्वी गायब झाला होता. हा कांगारू नोगो स्टेशनला राहणारी सारा किन्नोनने पाहिला. त्यांनी सांगितलं की, मी माझ्या पतीसोबत काही कामानिमित्त बाहेर होती. तेव्हाच माझी नजर एका पांढऱ्या कांगारूवर पडली. हा कांगारू पाहून मी अवाक् झाले. साराने सांगितलं की, मला विश्वास बसत नव्हता की, मी एक पांढरा कांगारू बघत आहे. त्या म्हणाल्या की, त्याच्या बाजूला पांढरा कागद ठेवला असता तर समजलं असतं की, तो किती पांढरा आहे.
सारा म्हणाल्या की, कांगारू तिथून निघून जाण्याआधी आम्ही त्याचे काही फोटो काढले. जेव्हा त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर बघून लोक सुद्धा हैराण झाले. इतकंच नाही तर लोक आपापल्या अंदाजात कांगारूच्या फोटोवर कमेंट देत आहेत. बरेचजण म्हणाले की, त्यांनी कधीही पांढरा कांगारू पाहिला नाही.