सध्या सोशल मीडियावर रसोडे कौन था हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओवर मीम्सचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडीओ पाहिला नाही असा एकही व्यक्ती नसेल. आता पोलिसांनी रसोडे मे कौन था या प्रश्नाचं गमतीदार उत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे. आसाम पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेलं हे उत्तर मात्र गुन्हेगारांना अनुसरून आहे.
सोशल मीडिवर नागाव पोलिसांनी ड्रग पेडलर्सचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंना कॅप्शन देण्यात आलं आहे की रसोडे मे कौन था, हे दोन ड्रग पॅडलर्स असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पडद्यामागून व्हिटामीन्सच्या गोळ्या देत होते आणि त्यांनी कोडॅक्स आणि ड्रॅग्स लपवून ठेवले होते. तेवढ्यात नागाव पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि या दोघांना ताब्यात घेतलं.
लोकांनी या व्हिडीओला खूप प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या फोटोवर लोकांना गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. या फोटोला १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. ३०० पेक्षा जास्त रिट्वटि्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
हे पण वाचा-
वाह, मानलं गड्या! .... म्हणून त्यानं इंजिनिअरची नोकरी सोडून चहाची टपरी उघडली
मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा
'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र