स्पेनच्या संसदेत (Spain parliament) सर्वजण आपले कपडे सांभाळुन पाय वरती करुन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर कोणी इकडे तिकडे पळत होतं. कोणी जोरजोराने किंकाळ्या फोडतं होतं तर कुणी जे हातात मिळेल ते खाली फेकत होतं. संसदेतला हा गदारोळ (havoc) विरोधकांमुळे नव्हता तर झाला होता एका उंदरामुळे (rat).
स्पेनच्या संसदेत कामकाज पार पाडले जात होते. अचानक संसदेतून जोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले. इकडे तिकडे पळापळ सुरु झाली. काही कळण्याच्या आत संसदेत बोलणाऱ्या सभापती किंचाळल्या. कारण, समोर सर्व सदस्यांच्या दालनात फिरत होता उंदीर. सर्वांचीच तारांबळ उडाली. जो तो वाट फुटेल तिकडे पळू लागले. काहीजण खुर्च्यांचा आधार घेत वर उभे राहिले. आरडा ओरडा, गोंधळ सुरु झाला. एका उंदराने स्पेनच्या संसदेत सर्वच सदस्यांची भंबेरी उडवली होती. उंदिरमामा मात्र यथेच्छ गोंधळ घालत इकडे तिकडे फिरत होते.रॉयटर्स या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला. पोस्ट करताच हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला.
इथे नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केल्या. कुणी म्हटलं त्यांना एका मांजरीची गरज आहे, तर कुणी म्हटलं, यांच्यासमोर वाघ आला असता तर यांचे काय हाल झाले असते. जोतो कमेंट करुन या व्हिडिओचा आनंद घेत होतो. पोटभर हसत होता.