Real car of Tarzan the wonder car : अजय देवगण आणि वत्सल सेठ यांच्या 2004 साली आलेल्या 'टारजन द वंडर कार' सिनेमाने चांगली लोकप्रियता मिळवली होती. या सिनेमात एक अनोखी कार दाखवण्यात आली होती. या कारची त्या काळात चांगलीच क्रेझ होती. नंतर ही कार दुसऱ्या कोणत्याही सिनेमात दिसली नाही. अशात इतक्या वर्षानी आता या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इन्स्टावर इंफ्लुएंसर Jenil Variya ने हा व्हिडीओ त्याच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओत 'टारजन द वंडर कार' मधील रिअर कारची स्थिती दाखवली गेली आहे. कारची स्थिती फारच खराब झाली आहे. मुंबईच्या एका गॅरेजमध्ये ही कार पडली आहे. अनेकांचं स्वप्न राहिलेली ही कार पूर्णपणे भंगार झाली.
व्हिडिओत जेनिलने सांगितलं की, 20 वर्षाआधी सिनेमात दिसलेली ही कार डीसी कंपनीची होती. पण हे मॉडल फेल झालं होतं. कारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण या कारसोबत अनेकांच्या आठवणी जुळल्या आहेत. लाखो व्ह्यूज या व्हिडिओला मिळाला आहे. तर 5 लाख 70 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोकांनी कमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.