एक महिला मुळातच मल्टिटॅलेंटेड असते. एकावेळी अनेक कामे करण्याची महिलांना सवय असतेच. मुलांची काळजी घेताना प्रत्येक आईची दमछाक ही होतेच. म्हणूनच आईला 'सुपरवुमन' म्हणतात. स्वयंपाक करणे, घर स्वच्छ ठेवणे, मुलांना तयार करणे अशी अनेक कामे आईला करावी लागतात. पण कधी विचार केलाय का की दोन हात नसलेली आई ही सर्व कामे कशी करत असेल ?
कोण आहे ही सुपरमुमन ?
ब्रुसेल्सच्या बेल्जियम मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव आहे सारा तलबी. सारा जन्मत:च दिव्यांग आहे. तिला दोन्ही हात नाहीत. सारा ला ३ वर्षांची लिलिया ही मुलगी आहे. लिलियाला तयार करणे, तिच्यासाठी छान छान खायला बनवणे ही सगळी कामे सारा पायांनी करते. दोन हात नसले म्हणून काय झाले सारा कोणाहूनही कमी नाही.
मुलगी लिलिया लहान असताना साराला भीती वाटायची की आपल्या दिव्यांगपणामुळे लिलिया ला काही होऊ नये. तिला उचलताना काही झाले तर..? सुरुवातीचे ३ महिने खूपच कठीण गेल्याचं सारा म्हणते.
पायानेच करते हे काम
सारा एका पायाने सुरी आणि एका पायाने भाजी धरुन ती भाजी चिरते. लिलियाचे केस विंचरणे, तिला तयार करणे हे सगळं सारा पायानेच करते. साराने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती केक बनवताना सुद्धा दिसत आहे.
युट्युब वर आहे फेमस
सारा चे एक युट्युब चॅनल देखील आहे. यावर २.७४ लाख सबस्क्रायबर्स आहेत.सारा कशी काय इतकी अवघड कामे पायांनी करु शकते हे बघण्यासाठी तिचे फॉलोअर्सही उत्सुक असतात.