नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. देशातही कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनग्रस्तांची संख्याही तब्बल 11 लाखांच्या वर गेली असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 28,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी या सुचनांचं पालन केलं जात नाही. तसेच सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडालेला दिसत आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान मास्कबाबतच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका पत्रकाराने चक्क गाढवाची मुलाखत घेऊन मास्क न लावणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. हा व्हिडीओ पाहून थोडं हसू येईल मात्र पत्रकाराच्या भन्नाट कल्पनेचं तुम्हीही भरभरून कौतुक कराल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
एका पत्रकाराने गाढवाची मुलाखत घेतली आहे. मास्क न लावता रस्त्यावर बसलेल्या गाढवाला त्याने काही प्रश्न विचारले. त्यानंतर त्याने रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांनाही प्रश्न विचारला. जे मास्क न लावता फिरत आहेत त्याची तुलना गाढवासोबत केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. अशा अनोख्या पद्धतीने पत्रकाराने केलेल्या या जनजागृतीने सर्वांचंच मन जिंकलं असून कौतुक केलं जात आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रसार हा हवेतूनही होऊ शकतो याला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) दुजोरा देण्यात आला. त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे'कडून (CSIR) नागरिकांना बंद जागेवरही मास्क परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CSIR चे अध्यक्ष शेखर सी मांडे यांनी एक ब्लॉगमधून याबाबत महत्त्वाची माहिती दिली. वेगवेगळ्या संशोधनाचा उल्लेख करताना त्यांनी कोरोनाचा हवेतून प्रसार होऊ शकतो असं म्हटलं आहे. कोरोना संकटात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवू शकतो? यावर मांडे यांनी 'उत्तर सोप्पं आहे. गर्दीपासून लांब राहा, काम करण्याची जागा मोकळी असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद जागेवरही मास्कचा वापर करा' असं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...