Rishi Sunak Ashish Nehra: ब्रिटनमध्ये लिज ट्रझ यांचे सरकार ४५ दिवसांत कोसळले. त्यानंतर आज भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी इतिहास रचला. ते आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ऋषी सुनक यांनी पेनी मोरडॉन्ट यांना पराभूत करत विजय मिळवला. ऋषी सुनक यांना १८० हून जास्त खासदारांचे समर्थन मिळवले. पेनी मोरडॉन्ट समर्थकांच्या बाबतीत फारच मागे पडल्या, त्यामुळे त्यांनी आपले नाव मागे घेतले. अखेर ऋषी सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे सांगितले जात आहे. सुनक यांचे पंतप्रधान म्हणून नाव घोषित होताच, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे नाव व फोटो ट्विटरवर ट्रेंडिंग असल्याचे दिसून आले.
नेटकऱ्यांनी ऋषी सुनक आणि आशिष नेहरा या दोघांचे फोटो शेजारी-शेजारी लावत भन्नाट मीम्स शेअर केले. या दोघांचा चेहरा जवळपास सारखाच दिसतो असे मत बहुतांश नेटकऱ्यांनी मांडले. तर काहींनी या फोटोंवरून धमाल कमेंट्स पास केल्या. पाहूया या संबंधीचे काही निवडक ट्विट्स...
--
--
--
--
--
--
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा घटनाक्रम-
सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर लिझ ट्रस ऋषी सुनक यांचा पराभव करत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या. मात्र, त्यांनाही सत्तेचे गमक साधणे फार काळ शक्य झाले नाही आणि ४५ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. आधीच्या निवडणुकीत देखील ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत होते. पण लिझ ट्रस यांचा विजय झाला. त्यांना फार काळ हे पद भूषवता आले नाही. ब्रिटनमध्ये ४५ दिवसातच पंतप्रधान पदावर राहिलेल्या लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यात आली. यात सुरुवातीपासूनच ऋषी सुनक यांना प्रबळ दावेदार मानले जात होते. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.