सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहताना प्राण्यांची मस्ती पाहून खूप धम्माल येते, तर काही वन्य प्राण्यांचे व्हिडीओ तितकेच थरारक असतात. सोशल मीडियावर आता एका मगरीचा आणि कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मगर काही समजण्याच्या आतच समोरच्या प्राण्यावर हल्ला करते किंवा मगरीला पाहताच भीतीनं थरकाप उडतो असे अनेक व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी मगरीला घाबरलेलं पाहिलयं का? वाचून विश्वास बसत नाहिये ना? मग हा व्हिडीओ नक्की पाहा.
बिबट्याही जे करू शकलं नाही ते एका कुत्र्याच्या पिल्लानं केलं आणि विशेष म्हणजे मगरीनंही कुत्र्याच्या पिल्लाल घाबरून तिथून पळ काढला आहे. आयएफएस अधिकारी सुधा रेमेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पाहू शकता एक मगर जमिनीवर शांत बसली आहे.
तिच्याजवळ एक कुत्र्याचं पिल्लू आहे. ते पिल्लू मगरीवर जोरजोरात भुंकत आहे. मगरीला ते अजिबात घाबरत नाही. कुत्र्याचं पिल्लू इतकं भुंकतं की एका क्षणाला वाटतं मगर त्याच्यावर आता हल्लाच करेल.सुरूवातीला पाहिल्यांतर मगर कुत्र्यावर हल्ला करेल असं वाटतं पण असं काहीही होत नाही. उलट मगरच कुत्र्याला घाबरून धुम ठोकते. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता
कुत्रा मात्र काहीही ऐकायला तयार नसतो. मगरीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. नंतर कशीबशी मगर कुत्र्याच्या पिल्लापासून सुटका करते आणि लांब पळते. या व्हिडीओला नेटीझन्सची पसंती मिळाली असून आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीलो मिळाले आहेत. बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...