भिकारी कशा प्रकारचे जीवन जगतात आणि त्यांना कोणत्या अडचणी येतात? हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध यूट्यूब क्रिएटर रोहित साधवानी 24 तासांसाठी भिकारी झाला. रोहित साधवानी मंदिराबाहेर बसून भीक मागत होता. यावेळी त्याने फक्त पाण्याची बाटली सोबत ठेवली. सर्वप्रथम तो मंदिराबाहेर जाऊन बसला. त्याला तेव्हा भीक मागून फक्त पाच रुपये मिळत होते. मग त्याने काही लोकांकडे अन्न मागितले आणि अनेकांनी ते देण्यास नकार दिला.
एका भाजी विक्रेत्याकडून गाजर आणि फळ विक्रेत्याकडून केळी मिळाली. असेच बरेच तास निघून गेले. रोहितने याच दरम्यान अनेक गोष्टी अनुभवल्या. त्याला समजले की काही लोक खरोखर भिकारी आहेत आणि काही खरच गरजू आहेत म्हणून भीक मागतात. तर काही भिकाऱ्यांना पाहून वाटलं की ते कोणत्या ना कोणत्या टोळीचा भाग असावेत. यासोबतच भिकारी होणे किती कठीण आहे, याचीही जाणीव झाली. त्याला मानसिक आजारी असलेले लोक सापडले.
10 पैकी 7 लोक देतात अन्न
एक माणूस एकांतात बडबडत होता. याच दरम्यान रोहितला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. तो म्हणाले की, या कामात अनेक तास निष्क्रिय बसल्याने माणूस विचारात बुडून जातो. त्याच्याकडे करण्यासारखं काहीच नसतं. रोहित पुढे म्हणाला की, भिकाऱ्याच्या गेटअपमध्ये आल्यानंतर त्याला हेही कळलं की या फिल्डमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. 10 पैकी 7 लोक अन्न देतात. अनेकांनी त्याला जेवणही दिले आहे,.
चोवीस तासांत मिळाले 30 रुपये
फार कमी पैसे मिळतात. रोहितला चोवीस तासांत 30 रुपये मिळू शकले. अनवाणी चालल्यामुळे त्याच्या पायालाही फोड आले. याशिवाय त्याला आणखी एक गोष्ट जाणवली. त्याला पाहताच लोक पळत होते. तो भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरत असताना त्याच्या मित्रांनी हा व्हिडीओ बनवला. जो आता लोकांना खूप आवडला असून जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"