लिलावात कधी कोणत्या वस्तुला जास्त किंमत येईल सांगता येत नाही. एखाद्या वस्तुची किंमत ५० पैसे असते, त्या वस्तुची किंमत कधी ५ हजार होते तर कधी १० हजार रुपये सुद्धा होते. केरळमधून एक अशीच घटना समोर आली आहे. केरळ मधील पलक्कड येथे झालेल्या अशाच एका लिलावाची बातमी सोशल मीडियावर लोकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. या लिलावात एका साध्या कोंबडीसाठी ५० हजार रुपयांची बोली लागली आहे.
बुधवारी पलक्कड येथील एका मंदिरात झालेल्या लिलावात एका कोंबडीचा लिलाव करण्यात आला. पूरम सणासाठी निधी उभारण्याचा एक भाग म्हणून थाचमपारा कुन्नाथुकवू मंदिर समितीने कोंबडी लिलावासाठी ठेवली होती. सकाळी ७ वाजता सुरू झालेला लिलाव दुपारी १२ वाजेपर्यंत चालला. मंदिर समितीच्या अधिकार्यांना पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र कोंबडीचा लिलाव सुरू झाल्यावर ही बोली ऐकून सर्वांनाच धक्का बसला. कोंबडीसाठी अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त भाव ५० हजार रुपये लावण्यात आला. हा लिलाव कूल बॉईज नावाच्या संघाने जिंकला.
कूल बॉईजला पंचमी आणि कंपन्स या प्रतिस्पर्धी संघांकडून खडतर स्पर्धेचा सामना करावा लागला. मात्र अतिउत्साही तरुणांनी अखेर सर्वाधिक बोली लावून चिकन जिंकले. मात्र, खरा जॅकपॉट मंदिर समितीच्या हाती असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. बरं, हा लिलाव परिसरातील लोकांमध्येच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
Video: हाण की बडीव! रेस्टॉरंटमध्ये प्रियकरासोबत रंगेहात सापडली, आईने दोघांनाही बदडून काढलं
3 मार्च रोजी होणाऱ्या पूरम उत्सवासाठी निधी गोळा करण्यासाठी मंदिर समितीकडून दररोज वेगवेगळ्या वस्तूंचा लिलाव केला जात आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष एम विनू यांनी कोंबडी दान केली.
या लिलावात कोंबडीची बोली फक्त 10 रुपयांपासून सुरू झाली होती, काही वेळातच या कोंबडीची बोली ५० हजारांवर गेली.