कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, सफाई कामगार यांच्यासह पोलिसही दिवसाची रात्र करून कार्य करत आहेत. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हे वॉरियर्स कोरोनाचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वे पोलिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी त्या रेल्वे पोलिसाची तुलना जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टशी केली आहे.
पीयूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल इंदर यादव याची तुलना त्यांनी बोल्टशी केली आहे. इंदर यादव हे भोपाळ रेल्वे स्टेशनवर कार्यरत आहे. गोयल यांनी लिहीले की,''एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुध... भारतीय रेल्वेच्या या पोलिसानं उसेन बोल्टलाही मागे टाकले.''
गोयल यांनी या पोलिसाचे कौतुक का केले?दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्यात भोपाळ रेल्वे स्टेशनवरून स्थलांतरीत मजूरांना घेऊन रेल्वे जात होती. तितक्यात इंदर यादव हातात दुधाची पिशवी घेऊन पळताना व्हिडीओत दिसत आहे. रेल्वे मंत्र्यांनी इंदर यादवला रोख बक्षीस देण्याचीही घोषणा केली.
या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या साफिया हाश्मी या आईनं तिच्या 4 महिन्यांच्या भुकेल्या मुलासाठी दुध आणण्याची विनंती इंदर यादव यांना केली. ही श्रमिक ट्रेन कर्नाटकहून उत्तर प्रदेशयेथील गोरखपुरच्या दिशेनं निघाली होती. ती ट्रेन काही मिनिटांसाठी भोपाळ रेल्वे स्टेशनवर थांबली होती आणि तेव्हा साफियानं पोलिसांकडे विनंती केली. तिनं सांगितलं,''मुलीसाठी दुध आणू शकले नाही आणि त्यामुळे तिला पाण्यात बिस्किट बुडवून खायला घालत आहे.''
तिच्या मदतीला इंदर यादव धावून आले. पण, ते दुध घेईपर्यंत ट्रेन सुरू झाली आणि त्यांनी वेगानं धाव घेत त्या आईपर्यंत दुध पोहोचवले. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुधाची पिशवी घेऊन इंदर यादव यांची ती धाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!
चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!
पोलिसांत FIR दाखल झाल्यानंतर अखेर युवराज सिंगनं मागितली माफी