शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माऊली, तुला सलाम! एका वर्षाचं बाळ कडेवर सांभाळत दिल्ली स्टेशनवर RPF महिला 'ऑन ड्युटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:38 IST

RPF Police Mother carrying child on Duty, New Delhi Railway Station Stampede News: रेल्वे पोलिस असलेल्या या महिलेचे 'दुहेरी कर्तव्य' पार पाडतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

RPF Police Mother carrying child on Duty, New Delhi Railway Station Stampede News: दिल्लीत १५ फेब्रुवारीला एक विचित्र प्रकार घडला. महाकुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याच्या दृष्टीने अनेकांनी रेल्वेस्टेशन गाठले. अचानक अपेक्षित ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला आणि एकच गोंधळ उडाला. या धावपळीत चेंगराचेंगरी झाली आणि सुमारे १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. घडलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर आता नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. याचदरम्यान, एका महिला पोलिसाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन ती महिला आपले कर्तव्य बजावताना दिसतेय. तिच्या या समर्पणाला सारेच सलाम करत आहेत.

व्हायरल फोटो, व्हिडीओंमध्ये काय?

चेंगराचेंगरीचा प्रसंग घडून गेल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क आहे. पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरपीएफ आणि दिल्ली पोलिसांनी सज्जता दाखवली आहे. रविवारी १६ फेब्रुवारी रोजी आरपीएफ आणि दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष सतर्क करण्यात आले होते. सर्वांनीच आपली जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. रविवारी जेव्हा प्रवासी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होते, तेव्हा त्यांना एका महिला आरपीएफ जवान 'दुहेरी कर्तव्य' बजावताना दिसली. एक म्हणजे पोलिसांचे कर्तव्य आणि दुसरे म्हणजे आईपणाचे कर्तव्य.

कोण आहे ही आरपीएफ महिला जवान?

या महिलेचे नाव रीना आहे. ती आरपीएफमध्ये काम करते. ड्युटी दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून कॉन्स्टेबल रीना प्रवाशांना सतर्क करत आहे. तसेच ती तिच्या नवजात बाळाला कडेवर घेऊन आहे. आपले दुहेरी कर्तव्य बजावताना दिसते आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल रीनाचे कर्तव्य बजावतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी टिपले असून सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

सारेच या माऊलीला करताहेत सलाम!

या महिला आरपीएफ जवानाला पाहून लोक तिला सलाम करत आहेत. ही महिला जवान कडेवर छोटं बाळ असूनही अतिशय संयमाने प्रवाशांची मदत करताना दिसत आहे. त्यामुळे लोक तिच्या संयमी आणि शांत स्वभावाचीही स्तुती करत आहेत.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीNew Delhiनवी दिल्लीrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल