काहीजण आपल्या मज्जेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा दिवस खराब करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशावेळी बरेच आपला अपमान गप्पपणे सहन करतात. परंतु एका व्यक्तीने असं केले नाही. विमान प्रवासावेळी या व्यक्तीच्या पत्नीवर २ जण हसत होते. या पतीने पत्नीवर हसणाऱ्या त्या २ जणांचा असा बदला घेतला की सोशल मीडियात पतीचे कौतुक करण्यात येत आहे.
पतीने सोशल मीडियावर हा किस्सा शेअर केला आहे. विमान प्रवास करताना पत्नीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने तिची सीट मागच्या बाजूला घेतली. या प्रवाशाने जाणुनबुजून असे केले ज्यामुळे पती-पत्नीला बसण्यात त्रास होऊ लागला. या महिला प्रवाशाने व्यक्तीच्या पत्नीला त्रास देण्यासाठी सीट १० मिनिटे मागेपुढे केली. महिला तिच्यापतीसोबत हसायला लागली. जाणुनबुजून होत सहप्रवासी पत्नीला त्रास देत असल्याचे पतीच्या निदर्शनास आले.
नवऱ्याने कसा बदला घेतला?विमान लँडिंग झाल्यानंतर पतीने पत्नीचा अपमान करणाऱ्या त्या २ प्रवाशांचा बदला घेतला. पतीने पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी त्या पुरुषाचा (चेष्टा करणाऱ्या महिलेचा नवरा) मार्ग अडवला. मी त्याला पुढे जाऊच दिले नाही आणि त्याचे सामान हिसकावून घेतले. इतर प्रवासी विमानातून उतरण्याच्या तयारीत होते. मग सर्वात शेवटी मी त्याच्या बायकोला आधी जाऊ दिले. ते दोघे विमानातून शेवटी उतरले. त्यामुळे त्या माणसाला खूप राग आला होता.
लोकांनी केले कौतुकया व्यक्तीची पोस्ट वाचल्यानंतर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने त्याचे अभिनंदन केले आणि त्याला 'हीरो' म्हटले. तर दुसर्या युजरे म्हटले की 'स्वतःला दोष देऊ नका. काही लोकांमध्ये शिष्टाचार आणि इतरांबद्दल आदर नसतो..तर एकाने 'खूप छान केले बिग मॅन. जेव्हा लोक विमानात मुलांसारखे वागतात तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटतो. असे दिसते की ते कुठेही कधी गेले नाहीत.