सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ पाहून आपल्याला हसू येतं तर काही व्हिडीओ पाहू राग अनावर होतो. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये अनेक व्हिडीओ माणुसकीचं उत्तम उदाहरण देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही खरच या पठ्ठ्याचं कौतुक कराल.
सध्या आपण अनेक एनजीओमार्फत किंवा सेवाभावी संस्थांमार्फत भूतदयेबाबत ऐकत असतो. अशातच या व्हिडीओमधील माणसाने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एका मांजरीच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गाडीखाली एक मांजरीचं पिल्लू आली. तेवढ्यात एका माणसाने प्रसंगावधान राखून त्या पिल्लाचा जीव वाचवला. खरं तर एक गाडी पार्किंगमध्ये उभी होती. तेवढ्या एक मांजरीचं पिल्लू पळत आलं आणि गाडीच्या चाका जवळ जाऊन बसलं. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने गाडी सुरू केली.
तेवढ्यात मागच्या गाडीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने पाहिलं आणि हार्न वाजवून ड्रायवरला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायवर काही थांबला नाही. तेवढ्या ती व्यक्ती गाडीतून लगेच उतरला आणि त्या पिल्लाला वाचवलं. गाडीमध्ये लावण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे.
व्यक्तीने पिल्ला वाचवल्यानंतर पुढे जाऊन ड्रायवरने गाडी थांबवली आणि व्यक्तीला काय झालं अशी विचारणा केली. त्यावेळी व्यक्तीने मांजरीच्या पिल्लाकडे इशारा करून ड्रायवरला सांगितलं. त्या व्यक्तीने पिल्लाला रस्त्याच्या कडेला सोडून दिलं. त्यानंतर ते पिल्लू तिथून निघून गेलं. यूट्यूब व्हिडीओनुसार, ही घटना रशियातील सरगटकोए येथील आहे.