रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या वीस लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. या युद्धात युक्रेनची प्रमुख शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. युद्ध सुरू होऊन 14 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही रशियाला युक्रेनची राजधानी किव्हवर ताबा मिळवता आलेला नाही. जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. युक्रेनमधून अनेक व्हिडिओही समोर येत आहेत. (Russia and ukraine war videos)
यातच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नसली तरी, या व्हिडिओत युक्रेनचे सैनिक रशियाने टाकलेला एक विशाल बॉम्ब डिफ्यूज अथवा निकामी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते यासाठी पाण्याचा वापर करतात आणि आपला जीव धोक्यात घालून बॉम्ब डिफ्यूज करतात.
इमारत उडविण्यासाठी फेकला होता बॉम्ब -हा व्हिडिओ ट्विटर युजर @Charles_Lister ने शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले, रशियाने हा बॉम्ब एक इमारत उडविण्यासाठी टाकला होता. मात्र, युक्रेनियन्सनी तो दोन हात आणि एका पाण्याच्या बाटलीने डिफ्यूज केला. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की एक व्यक्ती बॉम्बवर पाणी टाकत आहे आणि दुसरी व्यक्ती अत्यंत शांत पणे बॉम्ब डिफ्यूज करत आहे आणि अखेर हे दोघे बॉम्बचा वरचा भाग बॉम्बपासून वेगळा करण्यात यशस्वी होतात. वृत्त लिहेपर्यंत जवळपास 20 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता.
व्हिडिओ पाहताना लोकांचा श्वासही थांबला - खरे तर, हा व्हिडीओ पाहून आनेकणी, या बॉम्बरवर पांढरा कापड का टाकला आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. तर, काही लोक या सैनिकांचे हे काम पाहून भयभीतही झाले. एका युजरने लिहिले, येथे कॅमेरामननेही छान आणि धाडसाचे काम केले आहे. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ पाहताना, काही अनर्थ होऊ नये, या काळजीपोटी आमचा श्वासही थांबला होता, असेही युजर्सनी म्हटले आहे.