Russia Ukraine War Funny Video: शेतकऱ्यानंतर आता युक्रेनी महिला! रशियन टँकमध्ये घुसली, दिसतील ती बटने दाबू लागली, अन् मग... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:09 PM2022-03-01T12:09:28+5:302022-03-01T12:10:22+5:30

Russia Ukraine War Funny Video: काल एका शेतकऱ्याने रणगाडा ट्रॅक्टरला बांधून पळवून नेल्याचा व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट झालेले असताना आता एका युक्रेनियन महिलेचा व्हिडीओ आला आहे. या महिलेने तर...

Russia Ukraine War Funny Video: Ukrainian Women entered in the Russian tank, buttons started pressing, drive Russian Military Vehicles | Russia Ukraine War Funny Video: शेतकऱ्यानंतर आता युक्रेनी महिला! रशियन टँकमध्ये घुसली, दिसतील ती बटने दाबू लागली, अन् मग... 

Russia Ukraine War Funny Video: शेतकऱ्यानंतर आता युक्रेनी महिला! रशियन टँकमध्ये घुसली, दिसतील ती बटने दाबू लागली, अन् मग... 

googlenewsNext

युक्रेनवर हल्ला करण्यास गेलेल्या रशियन सैन्याची अवस्था एवढी वाईट असेल असे वाटले नव्हते. जगातील महासत्तांपैकी एक असलेल्या रशियाच्या रणगाड्यांची एवढी भयानक खिल्ली उडविली जात आहे की पाहून हसू आवरणार नाही. काल एका शेतकऱ्याने रणगाडा ट्रॅक्टरला बांधून पळवून नेल्याचा व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट झालेले असताना आता एका युक्रेनियन महिलेचा व्हिडीओ आला आहे. या महिलेने तर...

रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनचे नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. सैन्यबळ कमी असल्याने रशियाच्या फौजांपुढे देशाचा टिकाव कसा लागेल, म्हणून हे नागरिकही शस्त्रे हातात घेऊन युद्धात उतरले आहेत. तर काही नागरिक रशियाच्या सैन्याने मागे सोडलेले रणगाडे, लष्करी वाहने यांची खिल्ली उडवत आहेत. एका महिलेने तर रशियाचे लष्करी वाहन चालविले आहे. हाच तो व्हिडीओ आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही. 

एका महिलेने टिकटॉकवर व्हिडीओ टाकला आहे. त्यात ती रशियन वाहनामध्ये बसताना दिसत आहे. त्यानंतर ती ते वाहन कसे वापरायचे ते लोकांना सांगत आहे. तिने हे लष्करी वाहन सुरु केले आणि चालवू लागली. काही सेकंदांचा हा व्हिडीओ @PSFAERO या हँडलद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. 

Web Title: Russia Ukraine War Funny Video: Ukrainian Women entered in the Russian tank, buttons started pressing, drive Russian Military Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.