युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:51 AM2022-02-26T11:51:59+5:302022-02-26T11:53:34+5:30
या व्हायरल फोटोमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही हा फोटो शेअर करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली - रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात युद्ध पेटले आहे. असे असतानाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत एक मुलगा युक्रेनचा झेंडा (Ukraine's Flag) आणि मुलगी रशियाचा झेंडा (Russian's Flag) खांद्यावर घेऊन सोबत उभे असलेले दिसत आहेत. मोठ्या संखेने सोशल मिडिया युजर्स हा फोटो पोस्ट करून शांततेचे आवाहन करत आहेत.
व्हायरल झाला कपलचा फोटो -
या व्हायरल फोटोमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही हा फोटो शेअर करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शशि थरूर यांनी शेअर केला फोटो -
शशी थरूर यांनी ट्विट केले की, हृदयस्पर्शी : युक्रेनचा झेंडा अंगावर घेतलेल्या एका व्यक्तीने रशियन ध्वज अंगावर घेतलेल्या महिलेलाला मिठी मारली आहे. युद्ध आणि संघर्षावर प्रेम, शांती आणि सहअस्तित्वाच्या विजयाची आशा करूया.
Poignant: A man draped in the Ukrainian flag embraces a woman wearing the Russian flag. Let us hope love, peace & co-existence triumph over war & conflict. pic.twitter.com/WTwSOBgIFK
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 25, 2022
शांतीतेचे आवाहन करतायत लोक -
शशी थरूर यांचे हे ट्विट खूप पसंत केले जात आहे. आतापर्यंत 38 हजारांहून अधिक युजर्सनी त्याच्या या ट्विटला लाईक केले आहे आणि 4 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विटही केले आहे. तसेच इतर युजर्सदेखील कॉमेंटमध्ये शांततेचे आवाहन करत आहेत.
असं आहे व्हायरल फोटोमागचं सत्य -
खरे तर हा फोटो तीन वर्ष जुना आहे. वॉशिंगटन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, फोटत दिसत असलेल्या महिलेचे नाव Juliana Kuznetsova असे आहे. हा फोटो जेव्हा क्लिक केला गेला, तेव्हा ती पोलंडमध्ये झालेल्या एक मैफिलीत (Concert) अपल्या होणाऱ्या पतीसोबत झेंडा घेऊन उभी होती.