Russia-Ukraine War: ...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:52 PM2022-02-26T12:52:35+5:302022-02-26T12:55:25+5:30

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात युक्रेनची एक महिला शस्त्रसज्ज रशियन सैनिकाशी भिडताना दिसत आहे...

Russia Ukraine war Ukrainian woman confronts russian soldier and says you are the occupants and fascists video viral  | Russia-Ukraine War: ...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO

Russia-Ukraine War: ...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO

googlenewsNext

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असतानाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात युक्रेनची एक महिला शस्त्रसज्ज रशियन सैनिकाशी भिडताना दिसत आहे. यावेळी, रशियन सैनिकांनी संबंधित महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने रशियन सैनिकाला जे उत्तर दिले, ते पाहून सोशल मीडियावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे.

खरे तर, एक महिला रस्त्यावरच एका शस्त्रसज्ज रशियन सैनिकाशी भिडते आणि त्याला प्रचंड सुनावते. रशियन सैनिक तिला शांत राहण्यास सांगतो. यावर ती महिला त्याला उत्तर देते, की तुम्ही आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही फॅसिस्ट आहात! तुम्ही आमच्या भूमीवर बंदुका घेऊन काय करत आहात? यानंतर, या महिलेने त्या रशियन सैनिकाला खिशात सूर्यफुलाच्या बिया ठेवायला सांगितले आणि म्हणाली, तुमच्या मातीतूनही सूर्यफूलच उगवेल.

हा व्हिडिओ पाहून संबंधित महिलेच्या धाडसाची प्रचंड प्रशंसा होत आहे. या महिलेचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. एका ट्विटर युजरने तर म्हटले आहे, की "युक्रेनमध्ये येणारे दिवस आणि रात्र दीर्घ आणि कठीन असण्याची शक्यता आहे. असे वाटते, की पुतिन जेवढे सहन करू शकतात, त्यांना त्याहून अधिक मिळणार आहे,"

Web Title: Russia Ukraine war Ukrainian woman confronts russian soldier and says you are the occupants and fascists video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.