समुद्रकिनारी गेल्यावर पोहण्याचा मोह आवरत नाही. पर्यटक अनेकदा समुद्रकिनारी पोहाण्यचा मनसोक्त आनंद घेतात. पण, कधी-कधी समुद्रात पोहणे जीवावर बेतू शखते. कारण, समुद्रात काही ठिकाणी शार्क माशाचा धोकाही असतो. शार्क हा समुद्रातील सर्वात धोकादायक मासा आहे. अनेकदा शार्क माशाने माणसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता ताजी घटना इजिप्तमध्ये घडली आहे. एका शार्कच्या हल्ल्यात रशियन पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हर्गहाडाच्या रेड सी रिसॉर्ट (Red Sea resort) शहरातील किनाऱ्यावर गुरुवारी ही घटना घडली. रशियन पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेला होता, यावेळी त्याच्यावर एका टायगर शार्कने हल्ला केला. यावेळी त्या व्यक्तीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाण्यात शार्कसमोर तो काहीच करू शकला नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे शार्क अटॅक क्लिक करा
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शार्क आपल्या तीक्षण दातांनी त्या व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडतान दिसत असून, तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पाणी त्या व्यक्तीच्या रक्ताने लाल झालेले दिसत आहे. किनाऱ्यावरील इतर पर्यटकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली.