Ruturaj Gaikwad Jethalal: महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफी सामन्यात एका षटकात ७ षटकार मारून विश्वविक्रम केला. २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नो बॉलसह सातच्या सात चेंडूवर षटकार ठोकले. त्याच्या या पराक्रमानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जेठालाल त्याचा रेकॉर्ड सांगत आहे. सलग ७ षटकार मारूनही ऋतुराज जेठालालचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला आहे, असे मजेशीर पद्धतीने म्हटले जात आहे.
जेठालालपुढे ऋतुराज पडला फिका?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये जेठालालने असा दावा केल्याचा व्हिडीओ आहे की एका ओव्हरमध्ये त्याने ५० धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड ७ षटकार मारूनही जेठालालचा हा विक्रम मोडू शकला नाही. हा एक काल्पनिक शो आहे. या शोमध्ये अभिनेता दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत आहे. दिलीप जोशी हे त्यांच्या दमदार कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो एका षटकांत ५० धावा काढल्याचे सांगत आहे. जेव्हा त्याला विचारले जाते की एका षटकात ५० धावा कशा होऊ शकतात. यावर जेठालाल म्हणतो की त्या ओव्हरमध्ये २ नो बॉल होते आणि त्याने ८ षटकार मारले. हा व्हिडिओ IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
----
ऋतुराजने झळकावले द्विशतक
एका षटकांत ७ षटकार मारण्यासोबतच ऋतुराजने त्या सामन्यात द्विशतकही ठोकले. त्याने १५९ चेंडूत २२० धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण १६ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, उत्तर प्रदेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या ४९ व्या षटकात त्याने विरोधी संघाच्या गोलंदाज शिवा सिंगच्या गोलंदाजीवर ७ षटकार ठोकले.