Salar de Uyuni, Bolivia: सालार दे उयुनी जगातील एक फारच अद्भूत ठिकाण मानलं जातं. कारण इथे जमीन एखाद्या आरशासारखी दिसते, ज्यात आकाशाचं फारच मनमोहक प्रतिबिंब दिसतं. हा नजारा बघून असं वाटतं जणू पृथ्वी आणि आकाशाचं 'मिलन' होत आहे. या अद्भूत नजाऱ्यासाठी हे ठिकाण जगभरात फेमस आहे. जो बघून मोहित झाल्यासारखं वाटतं. येथील एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ @Discover_No1 नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, बोलिवियातील सालार दे उयुनी आपल्या सगळ्यात सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. हे जगातील सगळ्यात मोठा मिठागर आहे.
कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं की, इथे मिठाचा एक मोठा थर जमिनीवर दूरपर्यंत पसरला आहे. वर्षाच्या काही निश्चित वेळेत आजूबाजूचे तलाव जेव्हा ओव्हरफ्लो होतात तेव्हा इथे दूरदूरपर्यंत पाणी भरलं जातं. ज्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. हेच कारण आहे की, येथील नजारा फारच आश्चर्यजनक असतो.
जगातील सगळ्यात मोठं मिठागर - सालार दे उयुनीला सालार दे तुनुपा नावानेही ओळखलं जातं. हे ठिकाण बोलीवियातील डॅनियल कॅम्पोस प्रांतात स्थित आहे.