शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

बापमाणसाला सलाम! 'झोमॅटो'चा डिलिव्हरी बॉय लेकीला घेऊन पार्सल द्यायला पोहोचतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 2:29 PM

व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून 'त्या' माणसाची स्तुती केली जात आहे

Zomato Delivery boy with baby Viral Video: इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सोशल मीडियामध्ये एखाद्या खूप छोटाशा कृतीला जगभर पोहोचवण्याची ताकद असते. झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या लहान बाळाला आपल्या कडेवर घेऊन ग्राहकाला फूड डिलिव्हरी करायला पोहोचल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला होत आहे. अनेकांनी त्या माणसाबद्दल सहानुभूती दाखवली आहे, तर काहींनी त्याला, पैसे कमवण्यासाठी इतर नोकरी-धंदा शोधण्याचा पर्याय सुचवला आहे. फूड डिलिव्हरी करतानाही आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या या माणसाच्या निर्णयाचे इंटरनेटवर स्वागत तर होत आहेच, पण त्यासोबतच वाहवा देखील मिळत आहे. एका फूड व्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली; झोमॅटो डिलिव्हरी बॉय त्याच्या बाळासह दिवसभर उन्हात फिरतो. यावरून हे सिद्ध होते की माणसाने मनापासून काही ठरवलं की तो काहीही करू शकतो." सोशल मीडिया युजर्सनी आपल्या लहान मुलांची काळजी घेत असतानाही कठोर परिश्रम करण्याच्या मनुष्याच्या निर्धाराची प्रशंसा केली.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया

ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि त्या माणसाला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "कृपया ऑर्डरचे तपशील खाजगी संदेशात शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि मदत करू शकू." Instagram वर शेअर केल्यापासून, व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने टिप्पणी केली, "अशा डिलिव्हरी एजंटना मदत केल्याबद्दल आणि त्यांना पैसे कमवण्याचे व्यासपीठ दिल्याबद्दल झोमॅटोचे आभार." दुसर्‍या यूजरने लिहिले की, “हे खूप प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत." तर एका युजरने लिहिले, "बाप हाच खरा हिरो असतो."

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलZomatoझोमॅटो