जर तुम्ही हॅरी पॉटरचे फॅन्स असाल किंवा नसालही तरी तुमचे डोळे उघडेच राहतील असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लियोनार्डो उगोलिनी (Leonardo Ugolini) नावाच्या एका सोशल मीडिया युजरने इन्स्टाग्रामवर हॉगवर्ट्स महल (Hogwarts castle) चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास होणार नाही की हा महल रेतीपासून काही मिनिटात तयार करण्यात आला आहे.
वाळूशिल्पकाराची ही कलाकृती पाहून तुम्हीही कौतुक कराल. व्हिडिओच्या सुरूवातीस, कलाकार लाकडी संरचनेच्या सहाय्याने राजवाड्याचे मुख्य बुरुज तयार करीत आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता जादूप्रमाणेच कलाकाराने अल्पावधीत कसा संपूर्ण जादूचा वाडा कसा तयार केला आहे. वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण
लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सनी खूपच पसंत केला आहे. हा व्हिडिओ लोक पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओवर भाष्य करताना लोक कलाकाराचे खूप कौतुक करीत आहेत आणि बर्याच टिप्पण्याही देत आहेत. असा व्हिडीओ आधी तुम्ही कधीही पाहिला नसेल. नेहमीत वाळू शिल्पकारांनी तयार केलेल्या कलाकृती सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सण उत्सव, स्वातंत्र्य दिन अशा विशेष दिवसांच्यानिमित्ताने वाळू शिल्पकार सुरदर्शन पटनाईक नेहमीच कलाकृती साकरतात. कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस