रेल्वे प्रवासासह तसेच विमान प्रवासातही अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. सध्या असीच एक घटना समोर आली आहे. अमरावती जबलपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये विंचूने चावा घेतला. यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. वेदनेने त्रस्त असलेल्या प्रवाशाला बैतुल स्थानकात उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
होशंगाबादच्या पिपरिया येथील रहिवासी सुनील कुमार सिंदे हे अमरावती जबलपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते. ट्रेन मुलताई आणि आमला दरम्यान होती, तेव्हा प्रवाशाला कळले की त्याच्या पायाला किडा चावला आहे. यानंतर तो वेदनेने घाबरलेल्या अवस्थेत जागा झाला आणि त्याने जवळ बसलेल्या प्रवाशांना सांगितले. यावेळी त्यांना विंचवाने दंश केल्याचे समोर आले.
भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू
यावेळी लोकांनी लाईट सुरू केली आणि त्यांच्या पायाजवळ एक तपकिरी रंगाचा विंचू दिसला. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने प्रवाशाने ट्रेनच्या टीटीला, कंट्रोल रूमला माहिती दिली. यानंतर बैतुल स्थानकवार यांना रुग्णवाहिकेत पाठवण्यात आले तर प्रवाहला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुलताई आणि आमला स्टेशन दरम्यान पायला विंचू चावल्याचे जाणवले. यामुळे ते खूप घाबरले. यानंतर सहप्रवाशांनी लाईय सुरू केली.यावेळी त्यांना तपकिरी रंगाचा विंचू दिसला. यामुळे काही वेळ रेल्वेत गोंधळ निर्माण झाला. त्यांना रेल्वे स्थानकावर थांबवून रुग्णालयात दाखल केले.