माणसांच्या चुकांमुळे अनेक मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात येत असतो. आतापर्यंत तुम्ही अशी अनेक उदाहरणं पाहिली असतील. सध्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यात आला असला तरी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. खाद्यपदार्थांचे कागद किंवा पाण्याच्या बॉट्ल्स सर्रास रस्त्यावर किंवा समुद्र किनारी फेकल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? याचा वाईट परिणाम मुक्या प्राण्यांवर होत आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की, आपली एक लहानशी चूक प्रांण्याच्या जीवावर बेतू शकते. या व्हिडीओत एक महिला हळूवारपणे कटरच्या साहाय्याने कासवाच्या गळ्यात अकडलेली प्लास्टिकची रिंग बाहेर काढत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे. तसंच या व्हिडीओला १५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.
हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. महिलेच्या प्रयत्नांनी या कासवाचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे. अन्यथा या छोट्याश्या जीवाला प्राण गमवावे लागले असते. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. प्लास्टीकचा वापर काळजीपूर्वक न केल्यास काय होऊ शकतं. हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनी प्लास्टिकच्या वापराबाबत जागरूकता बाळगायला हवी.
हे पण वाचा
बाबो! नाले सफाई करताना सापडला भलामोठा उंदीर; Video पाहून तुमचीही उडेल झोप
Video : काय सांगता राव? व्यायाम करता करता दळले जाताहेत गहू; पाहा 'हा' देशी जुगाड
अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'