शहर असो वा गाव खारुताई भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळते. इंडियन जायंट स्क्विरल म्हणजेच शेकरू ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.
जवळपास २ किलो वजन, ३ फूट लांब आणि रंगीबेरंगी शेकरू फार कमी बघायला मिळतं. सध्या एका शेकरू फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत.
शेकरूंना सामान्यपणे बिबट्या किंवा शिकारी पक्ष्यांकडून धोका असतो. याचं वागणंही जरा वेगळं असतं. हे शिकारींना पाहून पळण्याऐवजी झाडांना चिकटून राहतात. शेकरूंचा मुख्य आहार कंद-मूळं आहे. कधी कधी ते पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडीही खातात. मध्यप्रदेशातील सातपुडा जंगलात हे फार बघितले जातात.
शेकरूंची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसर्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत.