रात्री सव्वानऊ वाजल्यापासून फेसबुक, इन्स्टा, Whats app डाऊन झाल्याने जगभरातील युजरनी झकरबर्गच्या कंपन्यांची खिल्ली उडविण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. एका फोटोमध्ये तर वायरींच्या जंजाळामध्ये मार्क झकरबर्ग घुसून समस्या शोधत असल्याचे दाखविण्यात आले आहे. (Users trend mark zuckerberg, Delete Facebook on Twitter)
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टा गेल्या दोन तासांपासून बंद पडले आहे. एवढा वेळ बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधीही काही काळासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद झाले होते. परंतू हा काळ अर्धा किंवा तासभर एवढाच होता. परंतू दोन तास उलटून गेले तरी देखील फेसबुकला एरर काही शोधता आलेला नाही.
यामुळे य़ुजरनी ट्विटरवर #DeleteFacebook नावाचा हॅशटॅग सुरु केला. त्यावर तासाभरात सुमारे ३० हजारावर मिम्स आले होते. ही संख्या झपाट्याने वाढत होती. तर दुसरीकडे सिग्नलच्या नावाने #DeleteFacebook ला पछाडले. Signal ला लोकांनी 50000 हून अधिक वेळा कोट केले होते. दुसरीकडे सर्वाधिक ट्रेंड होणारे नाव हे Mark Zuckerberg चे होते. त्याला लोकांनी 188K ट्रेंड केले होते.
एका सद्ग गृहस्थाने मी याहू मेसेंजरवर सापडेन असे लिहिले..
मी आणि माझे मित्र...
चेक करायला सगळेच ट्विटरवर आले...
ट्विटरने धु धु धुतले...
एमएसईबीचा नवा वायरमन
मेस्सीदेखील आनंद साजरा करत होता.