अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांन मोठा दिलासा मिळाला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अशात सोशल मीडियात काही मजेदार मीम्सचाही पाऊस होऊ लागला आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा 15 ते 20 उशिराने धावत आहेत. मुंबईतल्याअनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा वेद मंदावला आहे. विक्रोळी, वडाळा, पवई या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.