हिल स्टेशनवर फिरायला गेलेल्या एका जोडप्यासोबत भीषण घटना घडली आहे. डोंगरावर चढताना बॉयफ्रेंडचा पाय घसरला आणि तो ६५० फूट खोल दरीत पडला. गर्लफ्रेंडसमोरच बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी या दोघांनी एक फोटो काढला होता. बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर मुलीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये हा आमचा अखेरचा फोटो असं लिहिलं.
द मिररनुसार, ३० वर्षीय एंड्रिया मॅजेटो त्याची गर्लफ्रेंड सारा ब्रॅँगटेसोबत इटलीच्या एका डोंगरावर भटकंती करायला गेला होता. त्याठिकाणी दोघेही मज्जामस्ती करत होते. अनेक फोटो काढले. एक फोटो दोघांनी डोंगरावरील कड्यावर उभा राहून काढला. परंतु त्यानंतर बॉयफ्रेंडचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. या घटनेत बॉयफ्रेंडचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर साराने इन्स्टावर फोटो शेअर करत आमचा अखेरचा फोटो, तू कायम माझ्यासोबत राहशील असं तिने पोस्ट केले.
रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टरची मदतडोंगरावरील कड्यावर उभा असताना मॅजेटोचा पाय घसरला. त्यानंतर तो दरीत पडला, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याचा जीव गेला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मॅजेटोचा मोबाईल पडला होता. तो उचलण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि ६५० फूट खाली दरीत पडला. या दुर्घटनेत त्याचा जीव गेला. मात्र या घटनेमुळे गर्लफ्रेंड साराला जबर धक्का बसला आहे. ती अद्यापही बॉयफ्रेंड या जगात नाही हे मानायला तयार नाही.
सारा-मॅजेटो एकमेकांवर खूप प्रेम करायचे. ते नेहमी भटकंती करायचे. एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. परंतु शनिवारी मॅजेटोच्या मृत्यूमुळे या दोघांची जोडी कायमची तुटली आहे. मॅजेटोच्या मृत्यूनं सारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी मॅजेटोच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तर साराने टाकलेल्या पोस्टवर नेटिझन्सच्याही भावूक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.