शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शाही पनीर, दाल मक्खनी, रायता आणि ९ चपात्या अन् बिल अवघं २६.३० रुपये! लोक म्हणताहेत लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 4:19 PM

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत.

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत. एक बिल १९८५ सालचं आहे. तर दुसरं २०२२ म्हणजे याच वर्षातलं आहे. बरं दोन्ही बिलांमध्ये ऑर्डर करण्यात आलेले खाद्यपदार्थ समान आहेत. पण बिलाच्या किमतीत प्रचंड तफावत आहे.  

१९८५ मध्ये अवघ्या ८ रुपये किमतीच्या शाही पनीरची किंमत आज ३२९ रुपये इतकी आहे. म्हणजे आता या डिशची किंमत ४० पटीनं वाढली आहेत. तर ५ रुपयांच्या दाल मखनीची किंमत आज ३९९ रुपये आहे म्हणजेच ३५ वर्षात किंमत ८० पट वाढली आहे. त्याकाळात ५ रुपयांना मिळणार्‍या रायतासाठी आता १३९ रुपये खर्च करावे लागत आहेत. एकूण बिल पाहिलं तर १९८५ सालचं बिल अवघं २६ रुपयांच्या घरात होतं. पण आता याच थाळीसाठी १२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.

आमच्या काळात खाद्यपदार्थ खूप स्वस्त होते, असं तुम्हीही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून अनेकदा ऐकलं असेल. पूर्वी अगदी ५ रुपयांत पिशवी भरून भाज्या यायच्या, पण आता या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. कारण आज जर तुम्ही बाजारात भाजी घेण्यासाठी गेलात तर ५०० रुपये अगदी सहज खर्च होतात. 

१९८५ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये फक्त २६ रुपयांत जेवणसोशल मीडियात व्हायरल झालेलं हे बिल १९८५ मधील एका रेस्टॉरंटचं आहे. बिलात शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी ऑर्डर केली गेली आहे. या खाद्यपदार्थांचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यावेळी शाही पनीर फक्त ८ रुपयात मिळायचे. तर दाल मखनी आणि रायता केवळ ५ रुपयांना मिळत होते. याशिवाय रोटीची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. एका रोटीची किंमत ७० पैसे होती. एकंदरीत हे संपूर्ण बिल २६ रुपये ३० पैसे इतकं आहे. त्यासोबत २ रुपये सेवा शुल्कही जोडण्यात आलं आहे. हे एका  रेस्टॉरंटचे बिल आहे. आता याच डिश आता हॉटेलमधून मागवण्यात आल्या तर त्याचं काय बिल येईल याची कल्पना करा. 

आता किंमती ४८ पटींनी वाढल्या१९८५ सालचं हे बिल पाहिलं तर विश्वास बसणे कठीण आहे. पुन्हा तेच खाद्यपदार्थ मागवले गेले तर आजच्या तारखेला याच गोष्टी १२६० रुपयांना मिळतील. शाही पनीर ३२९ रुपयांना, दाल मखनी ३९९ रुपयांना, रायता १३९ रुपयांना आणि रोटी २४ रुपयांना मिळत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय भरपूर कर भरावा लागला. ही दोन बिलं पाहिल्यास १९८५ पासून आतापर्यंत या खाद्यपदार्थांमध्ये सुमारे ४८ पट वाढ झाली आहे.

टॅग्स :billबिल