Shark Attack Video: ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात समुद्राचा आनंद लुटणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणावर शार्कने जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, शार्कने हल्ला केल्यानंतरही तो तरुण त्याच्याकडील कॅमेऱ्यात ही भयानक घटना शूट करत होता. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
हल्ल्यात पाय गमावला, घरच्यांना शेवटचा मेसेज केला...मिळालेल्या माहितीनुसार, मातियो मारियोती(Matteo Mariotti), असे या तरुणाचे नाव असून, तो इटलीचा रहिवासी आहे. क्वीन्सलँडमध्ये तो सागरी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. 8 डिसेंबर रोजी त्याचे संपूर्ण आयुष्यचं बदलून गेले. शार्कच्या हल्ल्यात माटेओला त्याचे पाय गमवावे लागले. त्या भयानक क्षणाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत मॅटिओने लिहिले की, 'शार्कच्या हल्ल्यानंतर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. मला वाटले हा माझ्या शेवट आहे, त्यामुळे मी व्हिडिओत प्रियजनांना आठवले आण व्हिडिओ शुटिंग सुरू ठेवली.'
सुदैवाने जीव वाचलाव्हिडीओमध्ये दिसत आहे की, किनाऱ्याजवळ पोहत असताना अचानक शार्क मातियोवर हल्ला करतो आणि त्याला पाण्यात ओढतो. मातियो जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण पाण्यात शार्कसमोर तो काहीच करू शकत नाही. तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओमध्ये मातियोचे कपडे फाटलेले दिसत आहेत, तसचे पाण्यावर सर्वत्र रक्त पसरले आहे. दैव बलवत्तर म्हणून मातियोचा जीव वाचतो आणि तो स्वतःहून पोहत किनाऱ्यावर येतो.
यानंतर त्याला ब्रिस्बेन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर हल्ल्यात मातियोचा उजव्या पायाचा पंजा तुटला असून, शार्कने डाव्या पायालाही गंभीर जखम केली आहे.