शशि थरूर यांनी लेखिकेसोबत स्ट्रॉबेरी खातानाचा फोटो केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:22 PM2022-06-13T19:22:35+5:302022-06-13T19:23:05+5:30

काँग्रेस नेते शशि थरूर विविध कारणांमुळे चर्चेत असतात.

Shashi Tharoor shares photo on twitter with female novelist geetanjali shree users troll him amid Rahul Gandhi ED Enquiry Row | शशि थरूर यांनी लेखिकेसोबत स्ट्रॉबेरी खातानाचा फोटो केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

शशि थरूर यांनी लेखिकेसोबत स्ट्रॉबेरी खातानाचा फोटो केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Next

काँग्रेस नेते शशि थरूर (Shashi Tharoor) हे कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी ते आपल्या इंग्रजी शब्दांवरील पकडीमुळे चर्चेत येतात, तर काही वेळा ते महिलांसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरतात. आजदेखील शशि थरूर हे एका फोटोमुळे चर्चेत आले आहेत. शशि थरूर यांनी एका महिलेसोबतचा फोटो पोस्ट केला. आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी हा फोटो ट्वीट केला. त्यात दोघांच्याही हातात स्ट्रॉबेरी पकडलेली दिसली. त्यामुळे या फोटोवरून नेटकऱ्यांनीदेखील त्यांना खूप ट्रोल केले.

काँग्रेसच्या शशि थरूर यांच्यासोबत असणारी ती महिला म्हणजे महिला साहित्यिक गीतांजली श्री (Geetanjali Shree) या आहेत. शशि थरूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर फोटो पोस्ट केला. शशि थरूर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला पोहोचले होते. या दरम्यान त्यांनी महिला साहित्यिक गीतांजली श्री यांची भेट घेतली आणि हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी थरूर यांना ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. पाहा काही निवडक ट्विट्स-

--

--

--

--

दरम्यान, राहुल गांधींची ED चौकशी सुरू असताना शशि थरूर यांची ही पोस्ट पाहून त्यांना ट्रोल करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज सकाळी ईडीच्या (ED) कार्यालयात पहिल्या टप्प्याच्या चौकशीसाठी हजर झाले. यावेळी राहुल यांची सुरूवातीला तीन तास चौकशी झाली. राहुल गांधी यांना लंच टाईमला बाहेर सोडण्यात आले होते. या काळात राहुल यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. या दरम्यान ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप काँग्रेस समर्थकांकडून करण्यात आला.

Web Title: Shashi Tharoor shares photo on twitter with female novelist geetanjali shree users troll him amid Rahul Gandhi ED Enquiry Row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.