नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका माकडाचे पिल्लू लहान मुलीला फरफटत नेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे पाहून अनेक लोक अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हणत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे.
या व्हिडिओत पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. एक माकडाचे पिल्लू खेळण्याच्या बाईकवर बसून लहान मुलीजवळ आले. त्यानंतर बाईकवरून उडी मारुन त्याने त्या मुलीवर हल्ला केला. तसेच, काही अंतरापर्यंत या माकडाच्या पिल्लाने मुलीला फरफटत नेले. यावेळी स्थानिक लोक त्यांच्यावर धावून गेल्यानंतर ते माकडाचे पिल्लू पळून गेले.
हा व्हिडिओ अमेरिकेचे माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, याआधी माकडाने बाईक चालविताना आणि मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करताना मी कधी पाहिले होते, हे मला आठवत नाही. या व्हिडीओला 4.5 मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर 58 हजारहून अधिक लोकांनी लाइक्स आणि 16 हजारहून जास्त जणांनी रिट्विट केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक प्राणी रस्त्यावर आणि माणसांच्या वस्तीमध्ये घुसत असल्याचे दिसून आले आहे.