मागील आठवड्यात केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूचा प्रसंग मलाप्पूरम येथे घडला. भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्ती मानवी वसाहतीजवळ आली. तेव्हा मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली. काहीतरी खायला मिळेल या आशेनं आलेल्या या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. अशीच एक घटना पुन्हा घडली आहे.
अन्नाच्या शोधात असलेल्या हत्तीचा थायलँडमध्ये मृत्यू झाला आहे. एका बागेजवळ असलेल्या विजेच्या तारांशी हत्तीच्या सोंडेचा संपर्क आल्यामुळे हत्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. इंडीया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिण थायलँडमध्ये घडली आहे. स्थानिक लोकांना हत्तीच्या मृत्यूची सुचना ६ जूनला पोलिसांना दिली. पोलीस ज्यावेळी घटना स्थळी पोहोचले तेव्हा हत्तीच्या सोंडेवर जळल्याचे निशाण त्यांना दिसून आले. हत्तीचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. पोलीसांनी बाग मालकांशी विचारपूस केली.
कोमास्क सीथादी आणि सिमर्थ मोयाई हे या बागांचे मालक आहेत. त्यांनी सांगितले की, या बागांच्या चारही बाजूंनी विजेच्या तारांचे कुंपण तयार केले आहे. कोणीही या तारांना ओलांडून येण्याचा प्रयत्न केल्यास जनरेटर आपोआप बंद होते. तारांमध्ये असलेल्या विद्यूत प्रवाहामुळे हत्तीचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या हाती आलेल्या नमुन्यांची तपासणी करत आहेत. या प्रकारणात आंब्याच्या बागांचा मालक दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
जे बात!...म्हणून त्यानं सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली, रक्ताचे नातलगच झाले वैरी!
आता जेवणाची ऑर्डर कॅन्सल केल्यास थेट ६ वर्ष तुरूंगवास; वाचा दंडाची रक्कम किती