भारतात अनेक चित्रविचित्र प्रथा असतात. त्यातील काही प्रथांमागे अंधश्रद्धा असण्याचीही शक्यता असते. सोशल मीडियावर सध्या एक असाच अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसला आहे. हा भयंकर व्हिडीओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...
खरंतर, हा व्हिडीओ एका ट्विटर युजरनं आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरनं लिहिलं की 'हा २०२१ मधील भारत आहे'. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता की, एक मुलगा भल्या मोठ्या कढईतील उकळत्या पाण्यात बसला आहे आणि त्यानं हात जोडले आहेत. याठिकाणी आजूबाजूलाही लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओ २०१९ मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्या वेळी कोणीतरी हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्याचंही संबंधित वृत्तात म्हटलं आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? किंवा मुलाला उकळत्या पाण्याचे चटके का बसत नाहीयेत? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.