चीनमधून (China) एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून बरेचसे आई-वडील चिंतेत पडले आहेत. हृदयाची धडधड वाढवणाऱ्या या व्हिडीओत दोन मुलं २२ मजल्याच्या इमारतीच्या टॉपवर बिनधास्तपणे उड्या मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (China Viral Video) झाला असून लोक या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. काही लोकांना प्रश्न उपस्थित केला की त्यांना इमारतीच्या छतावर का जाऊ दिलं?
हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल Sputnik ने शेअर केला आहे. त्यांच्यानुसार ही घटना चीनच्या चियानिंग शहरातील आहे. इथे २२ मजली इमारतीच्या टॉपवर दोन मुले खेळत होते. ते ज्या पद्धतीनं आणि जिथे उड्या मारत होते ते बघून आपल्यालाच भीती वाटते. सुदैवाने दोघांना काही झालं नाही. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने स्थानिक प्रॉपर्टी मॅनेजमेंटला बोलवलं. त्यांनी स्टाफ पाठवून मुलांना खाली उतरवलं आणि टेरेसचं दार बंद केलं.
हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांची चिंता व्यक्त केली. या व्हिडीओला आतापर्यंत २३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ५१२ शेअर मिळाले आहेत. बऱ्याच लोकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. काही म्हणाले की, आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं. इतक्या उंचीवर जाऊन उड्या मारणं हा खरंच मूर्खपणा आहे.