Funeral Turned into Party, Viral Video: एखाद्या व्यक्तीला देवाज्ञा झावी की घरातील वातावरण अतिशय दु:खद असते. अनेकांना अश्रू अनावर होतात. त्या व्यक्तीच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आणि त्याला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले लोक देवाचे नाव घेत मृतदेहाच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. पण इंग्लंडच्या बर्मिंगहॅम मध्ये विचित्र घटना पाहायला मिळाली. ही घटना अशाप्रकारची होती की जी तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकली नसेल किंवा पाहिली नसेल. या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या वेळी चक्क डीजे लावून मोठ्या आवाजात नाचं-गाणं चालू असल्याचं भयानक दृश्य पाहायला मिळालं.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील विटन दफनभूमीत हा विचित्र प्रकार घडला. कॅटी नावाच्या महिलेचे निधन झाले. तिला शेवटचा निरोप देण्यासाठी जेव्हा तिचे कुटुंबीय आणि मित्र दफनभूमीत पोहोचले, तेव्हा तेथे शांतता सभेचे आयोजन करण्यात येणे अपेक्षित होते. पण तसं न घडता, शोक व्यक्त करण्याऐवजी तेथे थेट पार्टी करण्यास सुरुवात झाली. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आला असून तो बराच व्हायरल झाला.
कॅटीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिला स्मशानभूमीत नेण्यासाठी लोक नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले. यावेळी जोरजोरात संगीत वाजवले जात होते. प्रत्येकजण नाचताना दिसत होते. या लोकांचे नाचतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. या लोकांनी अंत्यसंस्काराच्या वेळी असं का केलं असावं, याचा उलगडा झाला नाही. पण अशा प्रकारच्या घटनेचा नेटकऱ्यांनी मात्र निषेधच केला. तसेच, अनेकांनी याबद्दल तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली.