कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लोक आपापल्या घरीच आहेत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लोकांना स्वतःला बाहेर पडण्याची तसंच आपल्या लहान मुलांना बाहेर पडू देण्याची खूपच भीती वाटते. या दरम्यान अनेक लहान मुलं आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, गच्चीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन खेळतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
चीनमधील गुईझोऊ भागातील झुनी येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये २ मुलं एका इमारतीच्या छतावर खेळताना दिसत आहेत. एससीएमपीनं दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं 10 वर्षांच्या खालच्या वयोगटातील आहेत होती. तब्बल २० मिनिटं ही मुलं छतावर खेळत होती. विशेष म्हणजे ही मुलं ज्या ठिकाणी खेळत होती. तेथे संरक्षक कडा सुद्धा नव्हत्या. यातच एक मुलगा काहीसा घसरल्याचाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलांच्या पालकांवर सोशल मीडियावर टिका केली जात आहे.
हा व्हिडीओ SCMP या वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओला मुलांसाठी खेळायचा मोकळी जागा असूनही ते ३२ मजली इमारतीच्या छतावर खेळत आहेत, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या इमारतीच्या छतावर दोन विजेचे खांबही आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलं इमरजेंसी दरवाज्यातून गच्चीवर पोहोचली. पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच त्यांनी पालकांना चांगलचं सुनवलं आहे.
सावलीच नाही तर पाणी सुद्धा देतं हे अनोखं झाड; 'या' झाडाला खाचा पाडून लोक भागवतात तहान
चक्क एका कुत्र्यामुळं झालं होतं दोन देशांमध्ये भीषण युद्ध; हैराण करणारी ही अजब कहाणी!