Tiger Attack Shocking Video: वाघ हा पाळीव प्राणी नाही, पण काही वन्यजीव प्रेमी वाघालाही जीव लावतात. पण वाघाची काळजी घेणं आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं. पिंजऱ्यात असलेल्या वाघाच्या डोक्यावरून एक माणूस हात फिरवत होता, त्याचवेळी वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आणि त्याला रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राण गमवावे लागले. हे प्रकरण मेक्सिकोतील पॅरिबन मध्ये घडले.
मेक्सिको मधील प्राणीसंग्रहालयाची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीने वाघाला जेवण देण्याच्या उद्देशाने कुंपणाजवळ बोलावलं. वाघ जवळ येताच त्या व्यक्तीने त्याला वाघाच्या डोक्यावर हळूवार हात फिरवला. पण याच दरम्यान वाघाला काय झालं कळू शकलं नाही, पण वाघाने उजवा पंजा त्या व्यक्तीच्या अंगावर मारला. त्या व्यक्तीचे नाव जोस डी जीझस आहे. ते २३ वर्षांचे होते. वाघाच्या हल्ल्यामुळे जोस वेदनेने ओरडला. वाघाने त्याचा हात ओढून जबड्याजवळ आणला. त्यानंतर धारदार दातांनी त्या व्यक्तीवर हल्ला केला. त्या माणसाच्या हातातून रक्त वाहू लागले.
जोसला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याच्या जखमी हाताचे विच्छेदन करण्यास नकार देण्यात आला. डॉक्टरांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आणि जोस या मधुमेह ग्रस्त असल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडिओही मालकाने जारी केला आहे. तो खाजगी प्राणीसंग्रहालयात अनेक प्राणी ठेवतो. या प्रकरणाबाबत प्राणीसंग्रहालयाच्या मालकाने जोस यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. वाघाच्या मालकाने सांगितले की त्यांनी जोसचे वैद्यकीय बिल भरले. तसेच प्राणीसंग्रहालयाच्या सर्व परवानग्या त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.