Viral Video on Social Media: खेळाच्या सामन्यात काही वेळा खेळाडू आणि इतर स्टाफ इतके दंग होतात की आपण नक्की काय करतोय याचेही त्यांनी कधी कधी भान राहत नाही. अनेक वेळा फुटबॉलच्या सामन्यात खेळाडू आणि चाहते यांच्यात भांडणे किंवा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. कधी कधी एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला टक्कर मारतो, तर कधी एखादा खेळाडू दुसऱ्याला भर सामन्यात चावतो. असे विचित्र प्रकार बरेच वेळा खेळाच्या मैदानात पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या एका फु़टबॉल सामन्यातही असाच एक विचित्र प्रसंग पाहायला मिळाला. या घटनेत संघाच्या कोचने हद्दच केली. रेफरीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याने थेट एका महिलेला डोक्याने तोंडावर जोरात टक्कर मारल्याची घटना घडली.
सामना सुरू असताना संघाच्या कोचला रेफरीचा निर्णय पटला नाही. त्यामुळे त्यांच्या वाद सुरू झाला. या दरम्यान वाद शमवण्याच्या उद्देशाने सीमारेषेवर उभी असलेली एका महिला (लाईन वुमन) तेथे गेली. ती त्यांना समजावण्यासाठी गेली खरी.. पण रागाच्या भरात त्या कोचने थेट महिलेच्या तोंडावरच डोक्याने टक्कर मारली. पाहा व्हिडीओ-
ब्राझीलच्या स्थानिक फुटबॉल लीगमध्ये (Campeonato Capixaba) हा विचित्र प्रसंग घडला. नोवा वेनेसिया (Nova Venecia) और डेसपोर्टिवा (Desportiva) या दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होता. हाफटाईमची शिटी वाजल्यानंतर डेसपोर्टिवा संघाचे कोच राफेल सोरियानो (Rafael Soriano) मैदानात आले आणि रेफरीशी वाद घालू लागले. त्यावरून त्यांना ताकीद देत येलो कार्डही दाखवण्यात आले. पण ते वाद घालतच राहिले. वाद शांत व्हावा म्हणून लाइन्सवुमन मार्सिएली नेटो (Marcielly Netto) ही महिला मध्ये आली. तर त्या कोचने थेट तिच्याच तोंडावर डोक्याने टक्कर मारली. या घटनेत महिलेच्या नाकाला दुखापत झाली. त्यानंतर लगेचच गार्ड्स मैदानात आले आणि त्यांनी महिलेला मैदानातून बाहेर नेले व कोचवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.