कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. गेले दोन ते तीन महिने सुरू असलेल्या या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे. नोकरी, व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे मिळकत बंद झाली आहे. याचा परिणाम माणसांच्या आयुष्यावरही होत आहे. घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसं मिळेल ते काम करायला तयार झाली आहे. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
६ वर्षीय जोया आणि ७ वर्षीय शाबीर या दोन लहान मुलांवर रस्त्यावर फुलं विकायची वेळ आली आहे. तामिळनाडू राज्यातील कोईबतूरच्या मरुधामलाईमधील ही घटना आहे. ही दोन्ही मुलं रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांची प्लास्टीकची पिशवी हातात घेऊन ही दोन लहान मुलं फुलं विकत आहेत. ही स्थिती लॉकडाऊनमुळे या मुलांवर ओढावली आहे. या दोघा भावडांचे वडिल रेल्वेमध्ये काही सामान विकून पैसै मिळवायचे. पण लॉकडाऊनमध्ये आता ट्रेन बंद असल्यामुळे त्यांनी घर चालवण्यासाठी फुलं विकायचा निर्णय घेतला.
द न्यूज मिनिटशी बोलताना शबीरच्या वडिलांनी सांगितले की, ''मी रेल्वेमध्ये फळं विकण्याचं काम करत होतो. माझी दोन्ही मुलं शाळेत शिकतात. पण आता माझी कमाई बंद झाल्याने शाळेची फी भरण्यासाठी फुलं विकून पैसे जमा करत आहोत. फुलं विकून एका दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळतात. मला माझ्या मुलांना अशा प्रकारे काम करायला लावल्यामुळे खूप वाईट वाटत आहे.''
पुढे ते म्हणाले की.'' मला अशी आशा आहे की सरकारकडून किंवा प्रशासनाकडून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी व्यवस्था केली जाईल.'' सोशल मीडियावर अनेकांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या माहामारीतही विद्यार्थ्यांकडून फी आकारत असलेल्या शाळांवर या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण