शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

सिंधुदुर्ग : थरारक पाठलाग करून दारू वाहतुक करणारी कार पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:09 PM

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले आहे.

ठळक मुद्दे ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाईएक ताब्यात, दारू वाहतुकीवर कडक कारवाईच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले आहे.

सोमवारी रात्री ११:३० वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाने आंबोली येथून थरारक पाठलाग करत विलवडे हायस्कूल (ता. सावंतवाडी) येथे गोवा बनावटीची वाहतूक करणाऱ्या कारवर केलेल्या कारवाईत २ लाख ८० हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह ६ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कार चालक अनंत अरुण मिस्त्री (२६ रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.ख्रिसमस व ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूकीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाला आंबोली मार्गे जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी सोमवारी रात्री आंबोली येथे सापळा रचला होता. रात्री ११:३० च्या सुमारास गोव्याहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच ०७ एच १९१७) या कारला थांबण्याच्या ईशारा करण्यात आला. मात्र ही कार न थांबता सावंतवाडीच्या दिशेने वेगाने निघून गेली.

६ लाखांचा मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या कारचा थरारक पाठलाग करत विलवडे हायस्कूल सावंतवाडी येथे ही कार थांबवून तपासली असता आत २ लाख ८० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारु आढळून आली. त्यामुळे गोवा बनावटीची अवैध दारू व कार असा एकूण ६ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच गोवा बनावटीची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कार चालक अनंत अरुण मिस्त्री या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली जवान शिवशंकर मुपडे, रमाकांत ठाकुर, चालक आदींनी केली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग