Viral Video : दक्षिण आफ्रिकेतील मालामाला गेम रिज़र्व (South Africa's MalaMala Game Reserve) मधील एका व्हिडीओत वाघिणीपासून दूर झालेले तिचे बछडे पुन्हा तिला भेटत असल्याचा अद्भुत आणि भावूक करणारा नजारा बघायला मिळाला. आई आणि लेकरांची ही भेट फारच भावूक करणारी आहे. हा व्हिडीओ येथील एका गाइडने रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ Latest Sightings या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला.
कंबुला वाघीण गाइड आणि रेंजरांना एका ठिकाणी घेऊन गेली जिथे तिचे छोटे छोटे बछडे आपल्या आईची वाट बघत बसले होते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बऱ्याच वेळानंतर आपल्या आईला बघून बछडे कसे तिच्याकडे धावत आलेत. झाडी-झुडपं आणि भीतीचं वातावरण असूनही सहा छोटे छोटे बछडे गवतातून बाहेर आले. ते त्यांच्या आईच्या आवाजाला ओ देत होते.
गाइड म्हणाला की, 'एक एक करत सगळे बछडे गवतातून धावत, आपल्या आईला आवाज देत बाहेर आले. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र आईला मीठी मारली. आपल्या आईचा आवाज ऐकून सहा बछडे उत्साही झाले होते आणि तिचा आवाज ऐकताच धावत सुटले'.
गाइड म्हणाला की, ते जसे आपल्या आईजवळ पोहोचले त्यांनी एकदम आईवर उड्या मारल्या. त्यांना भूक लागली होती. त्यामुळे त्यांना दूध हवं होतं. ते छोट्या मांजरीच्या पिल्लांसारखे होते. जशी आई खाली झोपली सगळे दूध पिण्यासाठी भिडले.