Slap on Face Viral Video on Social Media: कोणताही खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळला पाहिजे. प्रत्येक खेळात हार-जीत सुरू असतेच. पण पराभव पचवून विजेत्याचं अभिनंदन करणं ही खरी खिलाडूवृत्ती आहे. पराभूत खेळाडू विजेत्या खेळाडूचे हस्तांदोलन करून किंवा पाठीवर थाप देऊन अभिनंदन करतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण घानामध्ये एका टेनिस स्पर्धेदरम्यान एक अतिशय धक्कादायक घटना घडली. येथे सामना हरलेल्या खेळाडूने हस्तांदोलन करून प्रतिस्पर्ध्याला जोरात कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगाने व्हायरल होत आहे.
सोमवारी आयटीएफ ज्युनियर स्पर्धेदरम्यान ही विचित्र घटना घडली. १५ वर्षीय फ्रेंच खेळाडू मायकल कौमने सामना गमावल्यानंतर घानाचा खेळाडू राफेल नि अंकराह याला कानाखाली मारली. मायकल हा टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थानावर होता. पण अंकाराहकडून सुरुवातीच्या सेटमध्येच त्याला तोंडघशी पडावे लागले. त्यानंतर मायकलने पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला आणि सामना टायब्रेकवर नेला. मात्र, अंकाराहने चुरशीच्या लढतीत त्याचा पराभव केला. त्यानंतर ही घटना घडली. पाहा व्हिडीओ-
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, सामना हारल्यानंतर जेव्हा दोन्ही खेळाडू नेटजवळ पोहोचतात, तेव्हा मायकल अंकाराहला जोरदार चपराक मारतो. मायकलला पराभव सहन झाल्याने त्याने अशी वर्तणूक केल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना ऑस्करचा ऐतिहासिक कार्यक्रम आठवला, जेव्हा हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवल्यानंतर स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला चपराक लगावली होती.