डाळिंब खाणं सर्वांनाच आवडतं. पण अनेकांना ते सोलण्याचा कंटाळा येत असल्याने ते खाणं टाळतात. अनेकांनी तर डाळिंब खाणं यासाठी सोडलं कारण त्यासाठी मेहनत खूप करावी लागते. पण आता अशा लोकांसाठी एक भन्नाट आयडिया समोर आली आहे. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात डाळिंब कसं सोलायचं हे दाखण्यात आलं आहे.
ट्विटरवर @engineeringvids नावाच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत साधारण ३० मिलियन वेळा बघितला गेलाय. २४ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. तर ११२ हजार यूजर्सने लाइक केलाय.
व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चाकूच्या मदतीने इतक्या सहज डाळिंब सोललं. म्हणजे इतक्या वर्षात डाळिंब सोलण्याचं जे टेन्शन तुम्ही घेत होते, तो फारच मूर्खपणा वाटेल.
अनेक यूजर्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, 'इतके वर्ष झाले, शेकडो डाळिंब सोलले आणि हे मला आता दिसलं'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, 'व्हिडीओत दाखवलं तेवढं सोपंही नाहीये, पण वाईटही नाहीये'.