चप्पल फार कामाची गोष्ट आहे. चपलेशिवाय आता काम भागत नाही. कारण पायांना इजा होण्यापासून वाचता येतं. लाखो लोक चप्पल घालतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, ही चप्पल तयार कशी केली जाते? याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, ही चपप्ल कशी तयार केली जाते. चप्पल बनवण्याची प्रोसेस इतकीही सोपी नसते, जेवढी लोकांना वाटते.
इन्स्टाग्राम अकाउंट @namasteiindia वर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात हवाई चप्पल बनवण्याची प्रोसेस दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, पांढऱ्या-निळ्या रंगाची स्लिपर म्हणजे चप्पल कशी बनवली जाते. व्हिडिओत एक फॅक्टरी दाखवण्यात आली आहे. जिथे चप्पल बनवल्या जातात. फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या मोठ्या मशीन्स दिसत आहेत. ज्यात जुने आणि वितळलेलं रबर टाकलं जातं.
या रबरांचां वापर करून चप्पल कश्या तयार केल्या जातात हे तुम्हाला यात बघायला मिळतं. रबर मशीनमध्ये प्रेस केलं जातं आणि त्यातून चपलांच्या डिझाइन तयार केल्या जातात. ही प्रोसेस तुम्ही आधी कधी बघितली नसेल.
या व्हिडिओला आतापर्यंत 4 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी हा व्हिडीओ बघून त्यांना कसं वाटलं ते यातून सांगितलं आहे.