Slow Bike Race : सिनेमात किंवा प्रत्यक्षात अनेकदा बाइक रेसिंग पाहिली असेल. लोक सुसाट वेगाने बाइक चालवतात. तसेच तुम्ही स्लो सायकल खेळाबाबतही ऐकलं असेल. मात्र, स्लो बाइकची स्पर्धा क्वचितच पाहिली असेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तुम्हाला स्लो बाइक रेसिंग बघायला मिळत आहे. जी व्यक्ती बाइक स्लो चालवेल ती यात विजेती ठरते. या अनोख्या रेसमध्ये एक तरूण आणि एका तरूणीने भाग घेतला आहे. यात कोण जिंकतं हे बघणं मजेदार ठरेल.
इन्स्टाग्राम अकाऊंट@mr_histry_rl वर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडत आहे. कारण यात एक तरूणी आणि तरूण रेसिंग करताना दिसत आहे. तरूणी स्कूटी चालवत आहे तर तरूणाकडे बाइक आहे. दोघेही स्लो रेसिंग करत आहेत. फास्ट रेसिंगमध्ये नियम असतो की, जो सगळ्यात वेगाने चालवून लाइन पार करेल ती व्यक्ती जिंकेल. मात्र, स्लो रेसिंगमध्ये नियम उलटे असतात. यात जो स्पर्धक सगळ्यात स्लो बाइक चालवेल तो जिंकतो.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जमिनीवर चुन्याच्या मदतीने ट्रॅक बनवण्यात आले आहेत. ज्यात एक तरूणी आणि एक तरूण रेसिंग करत आहेत. हे रेसिंग पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे तरूणी या रेसिंगमध्ये विजयी ठरली आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'गाडी इतक्या स्लो चालवायची आहे तरी हेल्मेटची काय गरज?'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'बाइक आणि स्कूटीमध्ये स्लो रेसिंग लावणं चुकीचं आहे'.