लहान मुलं खेळताना त्यांच्या हाताला लागेल किंवा डोळ्यासमोर दिसेल ती वस्तू उचलतात. त्यांच्यासाठी सर्वकाही खेळणंच असतं. अशाच एका चिमुकलीने खेळता खेळता चक्क जिवंत सापच हातात धरला (Child playing with snake video). इतकंच नव्हे तर तिने तो साप आपल्या गळ्याभोवतीही गुंडाळला. अंगाचं पाणी पाणी करणारा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake in girl hand).
साप म्हटलं की मोठ्या माणसांच्याही अंगाला दरदरून घाम फुटतो (Snake video viral on social media). सापही माणूस जवळ दिसताच आपल्या बचावासाठी हल्ला करतात किंवा दंश करतात. अशा खतरनाक सापाला पाहून एका चिमुकलीने मात्र त्याला हातात धरलं. त्याची शेपटी आपल्या एका हातात पकडून त्याला उचललं आणि आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं.
व्हिडीओत पाहू शकता गळ्याभोवती साप गुंडाळलेली ही चिमुकली. तिला पाहून आपल्याला धडकी भरते. पण तिच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. एखादं खेळणं असावं असं बिनधास्तपणे जिवंत साप तिने आपल्या हातात धरला आहे आणि निवांत एका ठिकाणी एकटक पाहते आहे.
आश्चर्य म्हणजे सापही शांत आहे. मुलीने त्याची शेपटी धरली तरी तो तिच्यावर हल्ला करताना दिसत नाही आहे. सापाचं तोंड जमिनीच्या दिशेने आहे, पण तरी तो चिमुकलीच्या हातातून सुटण्यासाठी वगैरे धडपड करताना दिसत नाही आहे.
@snakemasterexotics इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकंदर व्हिडीओ पाहता हा साप पाळलेला असावा असं दिसून येतं आहे. पण लहान मुलांना पालकांनी अशा खरतनाक प्राण्याच्या संपर्कात ठेवल्याने लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत. चिमुकलीबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.