कोरोनाकाळात वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व वाढलंय तसंच लोक कोरोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायजर, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सॅनिटाजर वापरतेवेळी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली नाही तर मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. अल्कोहोलमुळे असं काही झालं असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी एका कारमध्ये हॅण्ड सॅनिटायजरचा वापर केल्यामुळे आग लागली आहे. अमेरिकेच्या Maryland मधून ही घटना समोर आली आहे. Montgomery County Fire and Rescue Service नं दिलेल्या माहितीनुसार हॅण्ड सॅनिटायजर वापरताना ही आग लागली. यावेळी सोबतची व्यक्तीसुद्धा स्मोकिंग करत होती. त्यामुळे कारमध्ये भयंकर आग लागली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जळती कार दिसून येत आहे. कार चालकाला कसंबसं कारच्या बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. सध्या या माणसावर उपचार सुरू आहेत. सॅनिटायजरमध्ये एथेनॉल किंवा isopropanol हा ज्वनलशील पदार्थ असतो. म्हणून वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. याआधीसुद्धा असाच प्रकार घडला होता. एका महिलेनं मेणबत्ती लावत असताना सॅनिटायजरचा वापर केला होता. त्यावेळी आग लागल्यानं या महिलेची त्वचा संपूर्ण जळाली होती. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक