सोशल मीडियावर (Social Media) हिरव्या रंगाच्या सापाचा (Green Snake) व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचासुद्धा थरकाप उडू शकतो. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाचा साप अचानक बाईकभोवती येऊन बसला आहे. (Snake Entangled Around The Handle Of The Motorbike) सापाला पाहून बाईक चालवणारी महिला चांगलीच हादरल्याचं तिच्या आवाजावरून समजून येत आहे. रात्रीच्यावेळी बाईक चालवत असलेल्या महिलेला आपल्या गाडीवर साप येऊन बसला आहे. याची कल्पना नव्हती.
हँडलवर साप येताच ही महिला एका हातानं गाडी चालवू लागली. तीने बाईक थांबवून कॅमेर्यावर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली. ही घटना 3 मे रोजी थायलंडमधील उथाई थानी येथे घडली. हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'साप कोठून आला हे माहीत नाही.' पै पै जमवून महिलेनं अखेर स्वतःचं घर घेतलं; अचानक पायऱ्या बाजूला सरकवताच दिसलं असं काही.....
या व्हिडीओला आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ७ मे ला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाला ठोका चुकला आहे. सुदैवानं या महिलेनं प्रसंगाधान दाखवत गाडी थांबवली आणि अनर्थ टळला. अन्यथा तीने घाबरून नियंत्रण सोडले असते तर दुखापत होण्याचीही शक्यता होती. तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी